Good News; मध्य रेल्वेच्या १८ उत्सव विशेष ट्रेनचा दर्जा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:24 PM2021-12-18T12:24:55+5:302021-12-18T12:24:58+5:30

नियमित गाड्या धावणार; तिकीट दर कमी होणार, प्रवाशांना दिलासा मिळणार

Good News; 18 festival special train status of Central Railway | Good News; मध्य रेल्वेच्या १८ उत्सव विशेष ट्रेनचा दर्जा काढला

Good News; मध्य रेल्वेच्या १८ उत्सव विशेष ट्रेनचा दर्जा काढला

Next

सोलापूर : कोरोनाकाळात उत्सव विशेष ट्रेन या नव्या नावाने धावणाऱ्या १८ गाड्यांचा उत्सव विशेष ट्रेनचा दर्जा काढला आहे. या सर्वच गाड्या नियमित झाल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे येथून सामान्य शुल्कासह सुटणाऱ्या पूर्णत: आरक्षित गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग २१ डिसेंबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले. नियमित करण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळा व तपशील जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे. प्रवाशांनी प्रवास करीत असताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क न घातल्यास प्रवाशांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

-------

या गाड्या झाल्या नियमित...

  • - पुणे- दरभंगा
  • - दरभंगा- पुणे
  • - पुणे- लखनौ
  • - लखनौ- पुणे
  • - लोकमान्य टिळक टर्मिनस -लखनौ - लखनौ- लोकमान्य टिळक टर्मिनस
  • - लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर
  • - गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस
  • - लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर
  • - गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस
  • - लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार
  • - शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस
  • - पुणे - गोरखपूर
  • - गोरखपूर - पुणे
  • - पुणे - वाराणसी
  • - वाराणसी- पुणे
  • - पुणे - लखनौ
  • - लखनौ - पुणे (बुधवार)

---------

आरक्षित तिकीट असलेल्यांना रेल्वेत बसता येणार

ओमायक्रॉन या नव्या स्ट्रेनबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी रेल्वेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. रेल्वेने प्रवास करीत असताना प्रवाशांजवळ आरक्षित (कन्फर्म) तिकीट असेल तरच रेल्वेत बसता येणार आहे, अन्यथा त्या संबंधित प्रवाशाला प्रवास करता येणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Good News; 18 festival special train status of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.