Good News; दौंड - इंदूर एक्स्प्रेसला जनरल डबा वाढविला; सर्वसामान्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 06:24 PM2022-06-03T18:24:03+5:302022-06-03T18:24:09+5:30
सर्वसामान्यांची सोय : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा गेला विचार
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी दौंड - इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आता रेल्वेत आणखीन जागा मिळणार आहे.
अनारक्षित प्रवाशांची वाढती गर्दी व मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दौंड-इंदूर एक्स्प्रेस डब्यात जनरल डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या एक्स्प्रेसला २२ कोच असणार असून, यात ब्रेकयान १, एसी २ टियर २, एसी ३ टियर ६, स्लीपर ८, जनरल ४, गार्ड ब्रेकयान १ असे २२ डबे असणार आहेत. कोच क्रमांक डी १ ते डी ३ हे २८ जून २०२२ पर्यंत आरक्षित असणार असून, २९ जून २०२२ पासून सर्व जनरल कोच अनारक्षित राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अतिरिक्त लागलेला कोच २ जून ते २९ जून २०२२ पर्यंत अनारक्षित राहणार आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.