Good News; खरेदी विक्रीसंबंधी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:05 PM2020-05-07T19:05:06+5:302020-05-07T19:07:40+5:30
सोलापूर जिल्ह्यात शेत जमीन, घर, प्लॉटची खरेदी विक्री सुरू होणार
सोलापूर : शेतजमीन, घर, प्लॉट व इतर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारासंबंधी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गुरूवारी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे शुक्रवार दि. ८ मे पासून खरेदी विक्री व्यवहार नोंदविण्याची कार्यालये सुरू होणार आहेत.
कोरोनााच्या साथीचा संसर्ग सुरू झाल्यावर १३ मार्चपासून जिल्ह्यातील व सोलापुरात असलेल्या उत्तर, दक्षिण दुय्यम नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली होती. मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी व व्यवहारासाठी दस्तऐवजावर घेण्यात येणाºया ठशांमुळे कोरोनाा विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका मोठा असल्याने ही कार्यालये तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहारातून शासनाला मोठा महसूल मिळतो. तसेच ही कार्यालये बंद झाल्याने अनेकांचे खरेदी विक्री व्यवहार थांबले होते. कार्यालयातील कर्मचारी व खरेदी विक्रीसाठी येणाºया लोकांमध्ये फिजीकल डिस्टन्स, मास्क आणि ठसे नोंदविताना काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कार्यालयात हात धुणे व सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे.