आनंदाची बातमी; या कारणामुळे मिळणार शेतकºयांना लवकरच वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:56 PM2020-03-04T13:56:32+5:302020-03-04T14:01:32+5:30
मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक; जिल्हाधिकाºयांनी घेतली महावितरणकडून माहिती
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकºयांसाठी एक खूषखबर आहे. जे शेतकरी वीजजोडणीच्या प्रतिक्षेत त्यांच्यासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नी लक्ष घातले असून, १६ मार्च रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १६ मार्च रोजी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. त्यात शेतकरी कर्जमाफी, पीककर्जवाटप आणि प्रलंबित वीजजोडणी हा महत्वाचा मुद्दा चचेर्ला राहणार आहे. शेतकºयांच्यादृष्टीने जिव्हाळ्याचे असणाºया या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी यावेळी चर्चा होणार असून, प्रलंबित वीज कनेक्शन जोडणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात वीज जोडणीच्या प्रतिक्षा यादीवर असलेल्या शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून घेतली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोनवेळा हा मुद्दा चचेर्ला आला. त्यावेळी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरले होते.
पालकमंत्री दिलीप वळसे—पाटील यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानंतर वळसे—पाटील यांनी शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांच्याच उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे ही आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकºयांच्या प्रश्नावर निर्णय होतील अशी अपेक्षा अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.