Good News; आरटीई प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविली; १० मार्चपर्यंत करता येणार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:25 PM2022-03-02T17:25:10+5:302022-03-02T17:25:18+5:30
सोलापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये जागृती झाली आहे.
सोलापूर : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार चालू वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही तारीख २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. यामुळे ज्या पालकांना या कालावधीत अर्ज भरता आला नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे. दरम्यान, शहरातून जवळपास पंधराशे अर्ज त्यापाठोपाठ उत्तर सोलापूरमधून १ हजार अर्ज आलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये जागृती झाली आहे. यामुळे प्रतिवर्षी आरटीई सत्तेसाठी विद्यार्थ्यांच्या अर्ज मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या सोलापुरात सुरू असलेल्या प्रक्रियेत एकूण ५ हजार पालकांनी अर्ज केले असून यातील ३,१८९ पालकांचे अर्ज निश्चित झालेले आहेत.
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ९३ टक्केपर्यंत प्रवेश झाले होते. यंदा ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण यंदा शाळांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळालेली आहे. या संधीचा लाभ पालकांनी घेत लवकरात लवकर अर्ज भरावे. प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचण असल्यास त्यांनी शिक्षण विभागाचे संपर्क साधावा.
- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी प्राथमिक
तालुकानिहाय प्रक्रियेसाठी सुरू असलेले अर्ज
- अक्कलकोट ११४
- बार्शी ३८०
- करमाळा ७५
- माढा ३२१
- माळशिरस २८८
- मंगळवेढा ४१
- मोहोळ १३४
- पंढरपूर ४०५
- सांगोला १६७
- उत्तर सोलापूर १,०४७
- दक्षिण सोलापूर १८०
- शहर १,४८१