Good News; दशकात प्रथमच जुलैमध्ये यंदा सोलापुरात पावसाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:38 PM2020-07-27T14:38:55+5:302020-07-27T14:45:04+5:30
सोलापूर जिल्हा : अक्कलकोट तालुक्याची आघाडी; ४८ मिलिमीटर नोंद
सोलापूर : जून-जुलै या दोन महिन्यांमध्ये दशकात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत तब्बल २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. २०१० मध्ये यापेक्षा अधिक म्हणजे ३३० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर या वर्षीच सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाला सुरुवात झाली. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू झालेला पाऊस जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज पडत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोकणासारखे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात जून महिन्यात १०२.५ व जुलै महिन्यात ९४.८ असा दोन महिन्यांत एकूण १९७.३ मिलिमीटर सरासरी पाऊस पडणे अपेक्षित आहे. जून व जुलै या दोन महिन्यांत २०१० नंतर यावर्षी सरासरीपेक्षा दीडपटीहून अधिक पाऊस पडला आहे.
सरासरी १९७.३ मिलिमीटर असताना २०१३ मध्ये २३५ मिलिमीटर तर २०१६ मध्ये १९८ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी २५ जुलैपर्यंत २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. म्हणजे या दशकात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या महिन्याच्या शिल्लक असलेल्या सहा दिवसांत पडणाºया पावसामुळे या आकडेवारीत आणखी भरच पडणार आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १४.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला. एकट्या अक्कलकोट तालुक्यात ४८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. असे असले तरी याच तालुक्यातील किणी मंडलात पावसाची शून्य इतकी नोंद आहे. शुक्रवारी किणी, शेळगी, तिºहे, उमरड, केत्तुर, वळसंग, आगळगाव, पांगरी, पानगाव, रोपळे व दहिगाव या मंडलात पाऊस पडला नसल्याचे दिसते.
तालुकानिहाय पाऊस व टक्केवारी
- उत्तर सोलापूर - २३८ मि.मी.(११०.२)
- द. सोलापूर - २२७ मि.मी. (१२३.४)
- बार्शी - ३१७ मि.मी. (१५२.८)
- अक्कलकोट - २९४ मि.मी.(४१.४)
- मोहोळ - २९२ मि.मी. (१८४.६)
- माढा - ३०८ मि.मी.(१८०.३)
- करमाळा - २४३ मि.मी. (१४२.७)
- पंढरपूर - २६३ मि.मी.(१५१.६)
- सांगोला - २९८ मि.मी.(१८५.४)
- माळशिरस - २९८ मि.मी. (१६८)
- मंगळवेढा - ३२५ मि.मी.(२१९.८)
६ एकूण २८५ मि.मी. (१५९.२ टक्के). २५ जुलैपर्यंत १७९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
या मंडलात सर्वाधिक पाऊस
- शुक्रवारी २४ जुलै रोजी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर मंडलात सर्वाधिक १०१ मिलिमीटर पाऊस पडला. याच तालुक्यातील चपळगाव मंडलात ६४ तर तडवळ मंडलात २८ मिलिमीटर पाऊस पडला.
- उत्तर तालुक्यातील मार्डी मंडलात १४ मिलिमीटर, दक्षिण सोलापूर तालुक्यात मुस्ती मंडलात २० मिलिमीटर, मोहोळ तालुक्यातील कामती मंडलात २२ मिलिमीटर, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी मंडलात ३९ मिलिमीटर, करमाळा तालुक्यातील केम मंडलात ५९ मिलिमीटर.
- पंढरपूर तालुक्यातील भाळवणी मंडलात ३० मिलिमीटर, सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडलात ३२ मिलिमीटर, माळशिरस तालुक्यातील नातेपुते मंडलात ४३ मिलिमीटर तर मंगळवेढा तालुक्यातील मारापूर मंडलात ३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.