Good News; सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:30 PM2021-01-14T12:30:40+5:302021-01-14T12:30:45+5:30

साेलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले : प्रयोगशाळेच्या चाचण्यांवर भर

Good News; Five talukas in Solapur district on their way to coronation ...! | Good News; सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे...!

Good News; सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे...!

Next

सोलापूर : जिल्ह्यात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांत रुग्ण पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. यावरून दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ व मंगळवेढा तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव ऑगस्ट, सप्टेंबरनंतर खूप वाढला. नोव्हेंंबरमध्ये मृतांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. त्यानंतर उपचार यंत्रणेत सुधारणा केल्यावर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण घटत गेले. सोलापूर शहराभोवती असलेले दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ येथे सुरुवातीला प्रभाव जाणवला; पण आता रुग्ण कमी झाले आहेत. सांगोला, मंगळवेढा तालुक्यातही रुग्ण घटले आहेत. पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा आणि बार्शी तालुक्यांत अद्याप रुग्ण आढळत आहेत. बाधितांमध्ये ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. मृत्यू झालेल्यांमध्येही मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा असे आजार असणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने कोरोना केअर सेंटरची संख्या घटविण्यात आली आहे. रुग्णालयात इतर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

तालुका ॲक्टिव्ह रुग्ण

  • पंढरपूर  ११४
  • अक्कलकोट              १४
  • बार्शी              ४८
  • करमाळा              ५८
  • माढा              ६९
  • माळशिरस             ५४
  • मंगळवेढा              २२
  • मोहोळ             २६
  • उ. साेलापूर              ०४
  • सांगोला             ३०
  • द. सोलापूर             ०८
  • उ. साेलापूर              ०४
  • सांगोला             ३०
  • द. सोलापूर             ०८

तीन तालुक्यांत आहे सध्या जास्त प्रभाव

सध्या पंढरपूर येथे ११४, माढा ६९, माळशिरस ५४, करमाळा ५८, माढा ६९ असे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर उत्तर सोलापूरमध्ये ४, दक्षिण सोलापूरमध्ये ८, अक्कलकोटमध्ये १४, मंगळवेढा २२, मोहोळमध्ये २६ रुग्ण आहेत. आता केवळ पंढरपूर, माळशिरस, बार्शी तालुक्यात प्रभाव दिसत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीणमधील ६६ पैकी ५५ कोरोना केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत.

Web Title: Good News; Five talukas in Solapur district on their way to coronation ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.