शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:23 PM2022-08-12T13:23:28+5:302022-08-12T13:24:27+5:30

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून बंडगार्डनमधून २३ हजार ६१३ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे.

Good news for farmers, Ujani Dam is 101 percent full | शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले

googlenewsNext

विठ्ठल खेळगी
सोलापूर : बंडगार्डन व दौंड येथून उजनीच्या दिशेने येणारा विसर्ग वाढल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत उजनी धरण १०१.४५ टक्के भरले आहे. दुपारपासून धरणाच्या १६ दरवाज्यातून ३० हजार क्युसेक व विद्युत प्रकल्पातून सकाळपासून १६०० क्युसेक असे एकूण ३१ हजार ६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय सकाळी वीर धरणातून ४२ हजार ९३३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या भीमा नदीत ७३ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून बंडगार्डनमधून २३ हजार ६१३ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. तर दौंडमधून ६० हजार ३४१ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी बारा वाजेपर्यंत १०१.४५ टक्के भरले आहे. सध्या धरणात ११८ टीएमसी जलसाठा असून उपयुक्त जलसाठी ५४.३५ टीएमसी आहे. भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूर परिस्थित उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.

मागील ४२ वर्षात ३५ वेळा शंभर टक्के
उजनी धरण सलग पाचव्यांदा शंभर टक्के भरत असून या अगोदर दि. २७ ऑगस्ट २०१८ ला धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट २०१९ व ३१ ऑगस्ट २०२० ला तर ५ ऑक्टोबर २०२१ ला शंभर टक्के भरले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दीड महिने आदी म्हणजेच १२ ऑगस्टला धरण १०० टक्के भरले आहे.  उजनीच्या ४२ वर्षाच्या इतिहासात धरण ३५ वेळा शंभर टक्के भरले आहे.

Web Title: Good news for farmers, Ujani Dam is 101 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.