दिव्यांगासाठी खुषखबर; तुम्हाला प्रमाणपत्र हवे ? मग ही बातमी नक्की वाचा

By Appasaheb.patil | Published: September 21, 2022 05:47 PM2022-09-21T17:47:21+5:302022-09-21T17:47:26+5:30

सिव्हीलमध्ये 27 ते 29 सप्टेंबरला सेवा पंधरवडा शिबीर; तपासणी केलेल्या दिव्यांगांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Good news for the disabled; Do you need a certificate? Then read this news for sure | दिव्यांगासाठी खुषखबर; तुम्हाला प्रमाणपत्र हवे ? मग ही बातमी नक्की वाचा

दिव्यांगासाठी खुषखबर; तुम्हाला प्रमाणपत्र हवे ? मग ही बातमी नक्की वाचा

Next

सोलापूर :- राज्य शासनाकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (सिव्हील) येथे २७ ते २९ सप्टेंबर २०२२ अखेर सेवा पंधरवडा शिबीर आयोजित केले आहे. 10 सप्टेंबरपूर्वी कागदपत्रे तपासणी केलेल्या दिव्यांगांनी प्रलंबित प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी उपस्थित राहून सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी केले आहे. 

सिव्हीलमधील दिव्यांग खिडकी येथे १० सप्टेंबर २०२२ पूर्वी नोंदणी करून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रे तपासणी केलेली आवश्यक आहे. इतर प्रक्रिया, तज्ज्ञाकडून तपासणी, चाचण्या आणि मूळ कागदपत्रे जमा न केलेले या कारणामुळे प्रलंबित असलेले दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. हे शिबीर सिव्हीलमधील त्या-त्या विभागात होणार आहे. 

नाक-कान-घसा, अस्थिव्यंगोपचार, मनोविकृती, नेत्रशल्यचिकित्सा, बालरोग, शल्यचिकित्साशास्त्र आणि औषधवैद्यकशास्त्र या विभागात दिव्यांगांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा पंधरवडा शिबीर आयोजित केल्याची माहिती डॉ. वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

Web Title: Good news for the disabled; Do you need a certificate? Then read this news for sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.