आनंदाची बातमी; एका वर्षात ५५७ रोजगार मेळाव्यातून मिळाली तीन लाख युवकांना नोकरी
By Appasaheb.patil | Published: June 7, 2023 04:35 PM2023-06-07T16:35:47+5:302023-06-07T16:36:13+5:30
सन २०२२-२३ अखेर आयुक्तालयामार्फत विविध योजना व ५५७ रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे २ लाख ८३ हजार उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सोलापूर : महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी "पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा" हे अधिक प्रभावी माध्यम आहे. सन २०२२-२३ अखेर आयुक्तालयामार्फत विविध योजना व ५५७ रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे २ लाख ८३ हजार उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दरम्यान, रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात.
या अनुषंगाने "कौशल्य केंद्र आपल्या दारी" या संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार इ. समवेत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ९ जून २०२३ रोजी, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे येथे "इंडस्ट्री मीट" चे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम मा. राज्यपाल, मंत्री, प्रधान सचिव, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.