दिलासादायक बातमी; मुंबई-हैदराबाद प्रवास आता एका तासाने कमी होणार
By Appasaheb.patil | Published: September 30, 2022 06:13 PM2022-09-30T18:13:28+5:302022-09-30T18:14:23+5:30
एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा; वेळेत अन् गाडीच्या क्रमांकात बदल
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस आता ‘सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सोलापूर ते हैदराबादचा प्रवास आता एका तासाने कमी झाला आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून या गाडीच्या वेळापत्रकात व क्रमांकामध्ये बदल झाला आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी लोकमत शी बोलताना दिली.
दरम्यान, गाडी क्र. २२७३१ हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस हैदराबादवरुन रात्री १०.३५ वाजता सुटणार तर सोलापूर स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५० ला पोहचणार आहे. पुढे छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर दुपारी ०१.०५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. २२७३२ छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावरून दुपारी ०२.१० ला सुटणार तर सोलापूर स्थानकावर रात्री १०.१० ला पाहचणार तर पुढे हैदराबाद ला दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.३० ला पोहचेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात कमी वेळ लागणार आहे.
-------------हे आहेत थांबे...
मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला सोलापूर विभागात बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद जं. , तंदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुर्गी, दुधनी, सोलापूर, कूर्डूवाडी, जेऊर, दौंड, केगाव, उरळी , पुणे जं., लोणावळा, कल्याण, दादर, छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनसला आगमन दुपारी ०१.०५ वाजता पोहचणार आहे.
------------
विजेवर धावणार गाडी
दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम झाल्याने एक्सप्रेस गाड्यांचा ताशी वेग वाढत आहे. अनेक गाड्यांच्या ताशी वेगात वाढ करण्यात आली असून अनेक एक्सप्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येत आहे. मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस आता विजेवर धावणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.