चांगली बातमी; ग्रामीण भागात आज एकही ‘कोरोना’ बाधित रूग्ण आढळला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 04:55 PM2020-06-02T16:55:39+5:302020-06-02T16:59:10+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट; जिल्ह्यातील ३२ जणांवर उपचार सुरू, ५ जणांनी केली कोरोनावर मात
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे. मात्र मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही़ आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४३ कोरोना बाधित रूग्ण आढळले, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला़ उर्वरित ३२ जणांवर उपचार सुरू असून ५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १ हजार २९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १ हजार २५५ निगेटिव्ह तर ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी सात जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात सातही जण निगेटिव्ह आढळून आले.