नवी नियमावली; लक्षणे दिसणाºयांचीच आता होणार कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:58 AM2020-06-09T11:58:03+5:302020-06-09T12:01:53+5:30
कोरोना उपचारासंबंधी केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी; आता लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक
सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली टाळेबंदी उठविल्यानंतर आता व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, पण दुसरीकडे कोरोना रुग्ण वाढतच आहेत. आता शासनाने फक्त लक्षणे दिसलेल्या रुग्णांचीच कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
कोरोना साथ सुरू झाल्यावर उपचारासंबंधी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. पहिल्या वेळेस ज्या भागात रुग्ण आढळतात त्या भागाचा तीन किलोमीटर परिसर कंटेन्मेंट तर पुढील सात किलोमीटरचा बफर झोन जाहीर करण्यात आला. पण दोन महिन्यांत रुग्ण वाढत गेल्यानंतर यात बदल करण्यात आले. अशाच पद्धतीने रुग्णाच्या उपचार पद्धतीत बदल झाले.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय व लो रिस्कमधील लोकांना होम व इन्स्टिट्यूटमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. त्यातही बदल होत कालावधी सात दिवसांवर आणण्यात आला. आता टाळेबंदी उठविल्यावर शासनाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. लक्षणे दिसणाºया रुग्णांचीच आता टेस्ट घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात येणाºयांना केवळ क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात येणाºयांनी स्वत: सात दिवस काळजी घ्यायची आहे, लक्षणे आढळली तर तत्काळ रुग्णालयात दाखल व्हायचे आहे.
टेस्ट होणार कमी...
- सध्या पॉझिटिव्ह आढळणाºया रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना आणून चाचणी केली जात आहे. यात निगेटिव्ह येणाºयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यासाठी वेळ व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे आता लक्षणे आढळणाºयांचीच चाचणी केली जाणार असल्याने चाचण्यांची संख्या घटणार आहे.