डाळिंब उत्पादकांसाठी खुशखबर, २ कोटी खर्चून उभारले कोल्ड स्टोअरेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:20+5:302021-09-23T04:25:20+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने ७५ टक्के व वखार महामंडळाने २५ टक्के असे सांगोला शीतगृहासाठी सुमारे २ ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने ७५ टक्के व वखार महामंडळाने २५ टक्के असे सांगोला शीतगृहासाठी सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले होते. दरम्यान, ऑगस्ट २०१०मध्ये वखार महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एम. एम. आरतानी सांगोल्यात आले होते. त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी शीतगृह देण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर १८०० मेट्रिक टन क्षमतेच्या गोडावून उभारणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने २० गुंठे जागा ३० वर्षांच्या भाडेतत्वावर वखार महामंडळाला दिली आहे. दरम्यान, वखार महामंडळाच्या शीतगृहाच्या उभारणीनंतर कृषी मालाची साठवणूक करणे शेतकरी व व्यापाऱ्यांना सुलभ होणार आहे.
..............
फोटो ओळ : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सुमारे २ कोटी रुपये खर्चून वखार महामंडळाने ८४० मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारले आहे.
.....................
राज्यातील दुसरे शितगृह
राज्यातील सांगोला, इंदापूर व कळमण या ठिकाणी नाशवंत माल साठवणूकसाठी शीतगृह
प्रकल्पांना राष्ट्रीय कषी विकास योजनेर्तगत प्रशासकीय मान्यता मिळवून सुमारे ११ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले होते. वखार महामंडळाचे राज्यातील दुस-या व पुणे विभागातील पहिल्या शीतगृहाची सांगोल्यात उभारणी केल्यामुळे शेतकरी ,व्यापा-यांना शेतीमाल ठेवण्यासाठी सोयीचे होणार आहे.
..................
असे आहे शीतगृह
सांगोल्यातील ८४० मेट्रिक टन क्षमता, तीन शीतगृह खोल्या, शीतगृह खोल्याचे ०अंश सेल्सिअस ते ( ) ४ डिग्री सेल्सिअस तापमान राखते. प्रत्येकी २८० मे.टन क्षमतेची प्री-कूलिंग एकूण तीन कक्ष, २४ तास वीजपुरवठा,जनरेटर बँकअप सुविधा ,शेतीच्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी उपयुक्त, अग्नि सुरक्षा, संपूर्ण कीटक नियंत्रित साठवण क्षेत्रासह २४ तास सुरक्षा व
व्यवस्था कसे हे शीतगह असणार आहे.