Good News; एकाच वेळी 45 मालट्रक्स घेऊन जाणारी रेल्वेची 'रो-रो' सेवा आता सोलापुरातही !

By Appasaheb.patil | Published: April 4, 2020 03:36 PM2020-04-04T15:36:34+5:302020-04-04T15:43:38+5:30

चाचणीस रेल्वे मंत्रालयाची मान्यता; ६८८ किमीचा टप्पा, उद्योजक, शेतकºयांसाठी वाहतुक सुविधा उपलब्ध होणार

Good News; 'Ro-Ro' service carrying 45 Maltrucks at the same time is now in Solapur too! | Good News; एकाच वेळी 45 मालट्रक्स घेऊन जाणारी रेल्वेची 'रो-रो' सेवा आता सोलापुरातही !

Good News; एकाच वेळी 45 मालट्रक्स घेऊन जाणारी रेल्वेची 'रो-रो' सेवा आता सोलापुरातही !

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अभिनव संकल्पनेतील ही योजनारेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवेने माल वाहतूक करणाºया ट्रक व्यवसायिकांची वेळ, इंधनाची बचत होतेयूरोप व प्रगत राष्ट्रांमध्ये प्रचलित असलेली रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा आपल्या सोलापुरातून

सोलापूर :  बेंगलुरू येथे आवश्यक वस्तूंच्या वेगाने वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील बाळे आणि बेंगलुरूमधील नेलमंगला दरम्यान रोल-आॅन-रोल आॅफ (रो-रो) सेवा सुरू करण्यासाठीच्या चाचणीस मान्यता दिली आहे़ या सेवेमुळे सोलापुर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतका-यासाठी जलद आणि सुरक्षित  वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील उद्योगाला अधिक चालना मिळणार असल्याची  माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शेलेंद्र गुप्ता यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकाच्या यादीत सोलापूरचा समावेश होतो़ दरम्यान, सोलापुर शहर हे अनेक महामार्ग व रेल्वेच्या प्रमुख मार्गाला जोडलेले एक शहर आहे़ सोलापूरातील कांदा, फळ, पाले-भाज्या, साखर, चादरी, वस्त्रोद्योगातील व इतर शेती मालाला भारतात चांगली मागणी आहे. या मालाची ने आन सोपी व कमी खर्चात व्हावी यासाठी सोलापुर ते बंगळूरु ह्या ६८० किमीच्या टप्प्यात रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा सुरू  करण्यासाठीमागील कित्येक वर्षापासून उदयशंकर पाटील यांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता़ याकामी सोलापूर विभागातील अधिकाºयांनीही सातत्याने हा प्रकल्प सोलापुरात आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयातील मंत्र्यांसह अधिकाºयांशी संपर्क ठेवला होता़ अखेर मोठया प्रयत्नानंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे विभागातील पहिल्या रो रो सेवेला मान्यता दिली.

काय आहे रेल्वे मंत्रालयाची रो-रो सेवा...
मध्य रेल्वे विभागात ही सेवा प्रथमच चालविली येत आहे. दोन पॉईंट्स दरम्यान ६८२ कि.मी.चे अंतर आहे. यामुळे डिझेलची बचत होते़ ही पर्यावरणपूरक सेवा आहे. कमी वेळेत एकत्र ट्रक घेवून जात असल्यामुळे अधिक सुरक्षितपणा येतो़  ही रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे या तीन रेल्वे झोनमधून धावणार आहे़  प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागतील आणि ती वाडी व धर्मावरममार्गे धावणार आहे़  या मालगाडीत ४३ खुल्या वॅगन आहेत पण त्या गाडीच्या आकारानुसार ४३ हून अधिक ट्रक किंवा लॉरी घेऊन जाऊ शकतात. प्रति ट्रक ३० टन माल वाहतुकीस परवानगी आहे. प्रती ट्रक प्रती टन २ हजार ७०० रुपये भाडे म्हणून त्यावर शुल्क आकारले जाते.  ड्रायव्हर आणि दुसरा एखादी व्यक्ती ट्रकच्या सोबत जाऊ शकते आणि त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकिटे खरेदी करावी लागतात.  कोकण रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (केआरसीएल) ही रो-रो सेवा सुरत्कल आणि कोलाड (मुंबईपासून १४३ किमी) दरम्यान काही वर्षांपासून चालू आहे.  प्रत्येक वाहतुकी (ट्रिप) साठी चार लाख रुपये देऊन केआरसीएलकडून भाडेतत्त्वावर एक रेक घेत आहे.

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अभिनव संकल्पनेतील ही योजना आहे़ देशातील उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ही रो-रो सेवा सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस होता़ या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतका-यासाठी जलद आणि सुरक्षित  वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील उद्योगाला अधिक चालना मिळणार आहे़
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर

रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवेने माल वाहतूक करणाºया ट्रक व्यवसायिकांची वेळ, इंधनाची बचत होते व प्रदुषण टाळता येते तसेच अपघाताची संख्याही कमी होऊ शकते़ यूरोप व प्रगत राष्ट्रांमध्ये प्रचलित असलेली रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा आपल्या सोलापुरातून सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. मागील दोन वर्षाच्या निरंतर प्रयासानंतर रेल्वे मंत्रालयाने भारतातील पहिल्या खाजगी रोल आॅन - रोल आॅफच्या आमच्या प्रस्तावास मान्यता दिली.
उदयशंकर पाटील,
उद्योजक, सोलापूर

Web Title: Good News; 'Ro-Ro' service carrying 45 Maltrucks at the same time is now in Solapur too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.