Good News; सोलापूर जिल्ह्यात ८२ हजार १४२ जणांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 02:17 PM2021-03-19T14:17:12+5:302021-03-19T14:17:18+5:30
७६.५ टक्के लशीकरण: ज्येष्ठ नागरिकांचा वाढतोय आकडा
सोलापूर: जिल्ह्यातील 82 हजार 142 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. उद्दिष्टाच्या ७६.५ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती लसीकरण विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
जिल्ह्यात आता कोरूना लसीकरणाला ज्येष्ठ नागरिक व जोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे गुरुवारी 164 आरोग्य, 228 फ्रन्टलाइन कर्मचारी व जोखमीचे आजार असलेले 1 हजार 22 आणि 3 हजार 145 ज्येष्ठ नागरिक अशा 4 हजार 559 जणांनी लस घेतली आहे. तसेच 634 आरोग्य व 371 फ्रन्टलाइन अशा 1 हजार 25 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 32 हजार 700 जणांनी लस घेणे अपेक्षित होते पण आत्तापर्यंत 82 हजार 142 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 31 हजार 694 आरोग्य, 13 हजार 330 फंटलाईन कर्मचारी 9 हजार 459 जोखमीचे आजार असलेले व 27 हजार 659 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे