Good News: सोलापूर ग्रामीणमध्ये २१ हजार चाचण्यात ९0 टक्के लोक निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:12 PM2020-08-06T12:12:29+5:302020-08-06T12:15:49+5:30
रॅपीड अॅन्टीजेन टेस्टच्या २१ हजार चाचण्या पूर्ण; केवळ २ हजार १२0 लोक आढळले बाधीत
सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात रॅपीड अॅन्टीजेन किटद्वारे चाचण्या घेण्याचा २१ हजाराचा टप्पा पूर्ण केला असून, या मोहीमेत ९0 टक्के लोकांना बाधा झाली नसल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोना विषाणूच्या संसगार्ची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ग्रामीण भागात रॅपीड अॅन्टीजेन किटद्वारे ५0 हजार चाचण्या घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तालुकानिहाय मोहीम राबविली आहे. ५ आॅगस्ट रोजी २१ हजार ७९ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.
यामध्ये १८ हजार ९५९ लोक निगेटीव्ह (८९.९४ टक्के) आले आहेत. तर २ हजार १२0 लोकांचा (केवळ १0.0६ टक्के) अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पंढरपूर, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोना संसगार्ची साखळी तुटेपर्यंत या चाचण्या सुरू राहणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
--------------------
अशा झाल्या रॅपीड अॅन्टीजेन चाचण्या
- तालुका चाचण्या पॉझीटीव्ह निगेटीव्ह
- अक्कलकोट २९४५ २७५ २६७0
- बार्शी ३२२२ ४४७ २७७५
- करमाळा १४४९ १६२ १२८७
- माढा १२१३ ११८ १0९५
- माळशिरस १२४५ ६४ ११८१
- मंगळवेढा १७३१ ८८ १६४३
- मोहोळ १४0३ ८६ १३१७
- उ. सोलापूर १५७१ २0३ १३६८
- पंढरपूर १२८१ ३0९ ९७२
- सांगोला ११0९ ५६ १0५३
- द. सोलापूर ३९१0 ३१२ ३५९८
- एकूण २१0७९ २१२0 १८९५९