चांगली बातमी; शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा सोलापुरातील कोरोना मृत्यूदराचा वेग खूप कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:32 PM2020-09-04T12:32:17+5:302020-09-04T12:36:31+5:30

कोरोनाबाधितमध्ये पुणे अव्वल: उशिरा सुरुवात होऊन कोल्हापूरने टाकले मागे

Good news; Solapur is much slower than the neighboring districts | चांगली बातमी; शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा सोलापुरातील कोरोना मृत्यूदराचा वेग खूप कमी

चांगली बातमी; शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा सोलापुरातील कोरोना मृत्यूदराचा वेग खूप कमी

Next
ठळक मुद्देसोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होतेकोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे

सोलापूर : कोरोनाचा मृत्यूदर वाढल्याने दोन महिन्यांपूर्वी देशात अव्वल ठरलेल्या सोलापूरचे नाव आता मागे पडले आहे. पुणे विभागात आता पुणे व  त्यानंतर कोल्हापूरला रुग्ण वाढले आहेत. 

जून आणि जुलै महिन्यात सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. कोरोनाने मृत्यू होण्याचेही प्रमाण अधिक होते. पण लॉकडाऊननंतर पुणे विभाग व मराठवाडा, विदर्भातील  जिल्ह्याने सोलापूरला मागे टाकल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात लवकर झाली. त्यामुळे मृत्यू वाढल्याने सोलापूरचे नाव देशपातळीवर गेले होते. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्यावर संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. २ आॅगस्ट ते २ सप्टेंंबर या कालावधीत पुणे विभाग, मुंबई व मराठवाड्यातील शहरांची स्थिती पाहिली तर सोलापूर आता कोरोना संसर्गात मागे पडले आहे. पुणे, कोल्हापूर हे विभागात आघाडीवर आहेत. 

एका महिन्यात पुणे विभागातील रुग्णांची 
स्थिती पुढीलप्रमाणे आहे. सोलापूर शहर: १ हजार ७०७ (मृत्यू: ५६), ग्रामीण: ८ हजार ४०३ (२३६),  पुणे शहर: ४४ हजार ५५५ (१२५), पुणे ग्रामीण: १७ हजार ८२६ (४३८), सातारा जिल्हा: ११ हजार ३५१ (२१९), कोल्हापूर शहर: ६ हजार १०१ (१५८), सांगली/मिरज: ६ हजार ९७७ (२२६), सांगली ग्रामीण: ५ हजार ६२४ (१६३), उस्मानाबाद जिल्हा: ५ हजार ३४९ (१२०), लातूर शहर: २ हजार ६६४ (७८), लातूर ग्रामीण: ३ हजार ६६५ (१०९) बीड: ४ हजार २०७ (१०५).

सोलापुरात चाचण्या वाढल्या
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १८ हजार ९७२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. यातील १४ हजार २४२ जण उपचारानंतर  कोरोनामुक्त झाले आहेत. या कालावधीपर्यंत ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होते. बळींचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. त्यानंतर चाचण्या व उपचार पद्धतीत सुधारणा केल्यावर मृत्यूचे प्रमाण घटले आहे. 

Web Title: Good news; Solapur is much slower than the neighboring districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.