Good News; ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांचे कामकाज सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:28 PM2020-06-05T15:28:05+5:302020-06-05T15:31:34+5:30
आणखी एक दिलासा : शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे करण्याची मुभा...!
सोलापूर : ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांचे शिक्षणाव्यतिरिक्त कामकाज सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून शैक्षणिक संस्थांमधील कामकाज बंद आहे. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून शासनाच्या ४ जून रोजी दिलेल्या सुचनेनुसार शैक्षणिक संस्था (विद्यापीठे, महाविद्यालये,शाळा) यांचे कार्यालय, कर्मचारी केवळ ई सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली आहे.
शिक्षणाव्यतिरिक्त (Non-teaching) कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहराच्या हद्दीतही सोलापूर विद्यापीठासह महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांना आता महापालिका आयुक्तांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.