प्रवाशांसाठी चांगली बातमी; एसटीचे लोकेशन आता मोबाईलवर कळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 10:21 AM2021-02-10T10:21:41+5:302021-02-10T10:21:46+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Good news for travelers; ST's location will now be known on mobile | प्रवाशांसाठी चांगली बातमी; एसटीचे लोकेशन आता मोबाईलवर कळणार

प्रवाशांसाठी चांगली बातमी; एसटीचे लोकेशन आता मोबाईलवर कळणार

Next

सोलापूर : राज्य परिवहन एसटी महामंडळाने राज्यातील सर्वच  गाड्यांना व्हीटीएस- व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम बसवण्याचे काम शंभर टक्के पूर्ण केले आहे. त्यामुळे आता एसटी कुठे आहे. किती वेळात येणार याची माहिती आपल्या मोबाईलवर समजणार आहे.

दरम्यान, याकरिता एसटी महामंडळाने स्वतःच्याच कार्यशाळेत तयार केलेले एमएसआरटी ॲप तयार केले आहे. नागरिकही या ॲपचा वापर करू शकणार आहेत.

ऍपवर कोणती माहिती मिळेल? 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम एमएसआरटीसी कॉम्प्युटर हे नवीन ऍप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्‍य होणार आहे. प्रवाशांना जवळची बसस्थानके, त्या ठिकाणी येणाऱ्या - जाणाऱ्या बस, बस कुठे जात आहे, सध्या ती कुठे आहे, बस किती वेगाने धावत आहे, बस किती वेळापासून थांबून आहे, बसचा पुढील स्टॉप कोणता आहे, बस क्रमांक काय आहे, बसचा मार्ग कोणता आहे हे देखील प्रवाशांना आता पाहता येणार आहे. 

Web Title: Good news for travelers; ST's location will now be known on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.