Good News; उजनी धरण १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 06:53 AM2021-10-06T06:53:35+5:302021-10-06T06:57:05+5:30

Lokmat news Network

Good News; Ujani dam 100 percent full; | Good News; उजनी धरण १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील पावसाचा परिणाम

Good News; उजनी धरण १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील पावसाचा परिणाम

Next

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास १०० टक्के भरले असून धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झालेला आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत धरणात १११.५९ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे. 

२०२१ च्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही एक लाख- दोन लाख क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही, परंतु दौंड येथून ३२०० क्युसेक्स ते २५-३० हजार  क्यूसेक्स पर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्केची पातळी गाठली आहे. धरणाच्या मागील ४२ वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही ३७ वी वेळ आहे.
 

उजनी धरणाच्या वरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरून 'ओव्हरफ्लो' झालेली आहेत, तसेच यातील ६ ते ७ धरणांमधून जास्त झालेले एकुण सहा ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे, त्यामुळे सध्या बंडगार्डन येथील विसर्ग ५७१० क्युसेक आहे तर दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे व सध्या तो ७६६३ क्युसेक इतका आहे आणि यामध्ये प्रत्येक तासाला वाढ होत आहे. ४ ऑक्टोबरपासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात  चांगली पर्जन्यवृष्टी चालू आहे व यामुळे सर्व नद्यांना पूर आलेले आहेत. हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. 

Web Title: Good News; Ujani dam 100 percent full;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.