पर्जन्यमान उत्तम, यंदाचा गाळप हंगाम चांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:30+5:302021-09-23T04:24:30+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा चेअरमन महेश देशमुख आणि संचालक ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा चेअरमन महेश देशमुख आणि संचालक पराग पाटील यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाच्या महामारीमुळे प्रगतीचे मार्ग रोखले गेले. आर्थिककोंडी झाली. साखर उद्योगाला त्याचा फटका बसला, तरीही कामगारांनी जिद्दीने कमी वेळात आगामी गळीत हंगामाची तयारी केल्याचे कौतुक महेश देशमुख यांनी केले
यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनीअर श्रीकांत मोरे, चीफ केमिस्ट नितीन माने, को-जन मॅनेजर श्रीकांत राव, अखिल बिटे, एम.पदमराज, केन मॅनेजर दीपक नलावडे यांनी यंदाचा गळीत हंगाम विक्रमी करण्याचा संकल्प केला.
------
फोटो ओळी
भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन करताना चेअरमन महेश देशमुख, संचालक पराग पाटील आणि अधिकारी वर्ग.