गुड बोला. गोड बोला...!; गोड बोलण्याने सामाजिक ऐक्य वाढीस चालना मिळते : प्रणिती शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:55 PM2019-01-19T12:55:32+5:302019-01-19T12:56:51+5:30
मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याची आपण एकमेकांप्रती इच्छा व्यक्त करतो. खरं तर या परंपरेतून आपल्या देशातील सामाजिक ...
मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याची आपण एकमेकांप्रती इच्छा व्यक्त करतो. खरं तर या परंपरेतून आपल्या देशातील सामाजिक ऐक्य आणखीन मजबूत होत आहे.
राजकीय दृष्टिकोनातून येणारा काळ पाहिला तर लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. राजकारण आणि निवडणुका म्हटलं की आरोप, प्रत्यारोप आले. पण या सणाचे महत्त्व लक्षात घेता आपली नाती सर्वश्रेष्ठ आहेत असे मला वाटते. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना मनात ठेवून गोड बोलण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
जातीपातीच्या भाषेमुळे देशाला वेगळे करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. भेदाभेद बाजूला सारून एकमेकांना तीळगूळ देऊन देश मजबूत करण्यासाठी आपण पुढे येऊ या. यामध्ये युवक, युवती आणि महिलांची ताकद मोठी आहे. खरं तर संक्रांत हा महिलांचा सण. वाण लुटताना देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्याची स्वप्ने आपण पाहूया. आपण सर्वजण एक झालो तर देशाची प्रगती वेगाने होणार आहे. प्रगतीकडे जाण्यासाठी सर्वजण एकमेकांना गोड बोला. गोड बोलण्याने आपला दिवस चांगला होणार आहे. दिवस चांगला गेला की सर्वत्र चांगले दिसणार आहे.
- आमदार प्रणिती शिंदे,
सोलापूर शहर मध्य