सुविचार माणसाला जगण्याचं बळ देतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 03:31 PM2020-07-11T15:31:46+5:302020-07-11T15:33:02+5:30
जगातील अनेक थोर तत्त्वज्ञांनी आपले अनुभव आणि सुविचारांची शिदोरी जनमाणसाला दिलेली आहे.
जीवन हे एक प्रकारचे युद्ध आहे. त्यामुळे जीवन जगत असताना माणसाला अनेक आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. हे जीवन युद्ध जिंकण्यासाठी शरीर आणि मनाचे ऐक्य असणं फार गरजचं असतं. कारण शरीराने आणि मनाने साथ दिली तरच तुम्हाला जीवनात सुखी आणि समाधानी होता येतं. जीवनात समोर येणा?्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मन शांत आणि निवांत कसं करायचं हे अध्यात्म विद्या शिकवते. अध्यात्म विद्या ही जीवनाचा एक छोटा पंरतू अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्या कडे इतर सर्व कला असतील मात्र जीवन जगण्याची कलाच नसेल तर जीवन युद्ध यशस्वीपणे जिंकता येणं कठीण आहे. यासाठीच जीवनाचे सार्थक होण्यासाठी माणसाला अध्यात्म विद्या माहीत असणं गरजेचं आहे. जगातील अनेक थोर तत्त्वज्ञांनी आपले अनुभव आणि सुविचारांची शिदोरी जनमाणसाला दिलेली आहे. हे सुविचार माणसाला जीवन जगण्याचं बळ देतात.
- सुधाकर जांभळे महाराज,
सोलापूर