गोपाळपूरचे गोपाळ कृष्ण मंदिर भाविकांसाठी बंद; गोपाळकाला न करताच यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:08 AM2020-07-05T09:08:11+5:302020-07-05T09:09:41+5:30
पौर्णिमेपूर्वी संताच्या पालख्यांनी केले प्रस्थान ; गोपाळकृष्णाचे धार्मिक विधी होणार मंदिरात
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या संताच्या पालख्या यात्रेची सांगता पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे गोपालकाला करुन करतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाचे संकट आहे. यामुळे संताच्या पालख्यांनी गोपाल काला न करताच यात्रेची सांगता केली आहे. परंतु परंपरा चालु ठेवत गोपाळपूर मंदिर समिती पौर्णिमेदिवशी गोपालकाला मंदिरातच करणार आहे. गोपालकाला होणार असला तरी भाविकांसाठी गोपाळकृष्णांचे मंदिर बंद असणार असल्याचे श्री गोपाळकृष्ण व इतर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिलीप गुरव यांनी सांगितले.
पोनि. किरण अवचर यांनी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरातील विश्वस्तांची बैठक घेतली. यावेळी दिलीप गुरव, दत्ता गुरव, सरपंच विजय जगता, उपसरपंच ग्रामसेविका ज्योती पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.
सध्या कोरोनाचे संकट आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आषाढी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आपण गोपाळपूर येथे साजरा होणारा गोपाळ काल्याचा कार्यक्रम रद्द करावा. हा कार्यक्रम झाल्यास त्याठिकाणी हजारो लोक एकत्रित येतील व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. यामुळे गोपाळकाला रद्द करावा. त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर पडला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सुचना पोनि. किरण अवचर यांनी दिल्या.
श्री गोपाळकृष्ण व इतर देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त यांनी गोपाळकाला उत्सव रद्द करणार आहे. गोपाळकाल्याचा धार्मिक पुजा मंदिरातच होतील. मंदिराबाहेर होणारा काला यंदा होणार नाही. यामुळे भाविकांनी काल्याचा प्रसाद घेण्यासाठी येऊ नये, भाविकांसाठी गोपाळकृष्ण मंदिर बंद ठेवणार असल्याचे दिलीप गुरव यांनी सांगितले.
गोपाळपूरला पोलीस बंदोबस्त
गोपाळकाल्यानिमित्त पौर्णिमेला भाविकाचंी गर्दी होऊ नये. कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी गोपाळपूर येथे १ अधिकारी व ४० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला असल्याची माहिती पोनि. किरण अवचर यांनी दिली.