"रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात"; शरद पवारांवर गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:10 PM2021-06-30T17:10:24+5:302021-06-30T17:12:17+5:30
Gopichand Padalkar on Sharad Pawar : त्यांचे या राज्यात तीन चारच खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. मात्र, असे असताना, कोंबड्याला काय वाटते, की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही, असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते.
सोलापूर - भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. पवारांच्या दिल्ली बैठकांवरून त्यांनी पवारांवर जहरी टीका काली आहे. पवार हे गेल्या 30 वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी तिसऱ्या आघाडीवरुन पवारांवर, अशा शब्दात टीका केली आहे. (Gopichand Padalkar venomous criticism of Pawar in solapur Compared with the hen)
पडळकर म्हणाले, "मी लहाण असल्यापासूनच शरदचंद्र पवार हे गेल्या 30 वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत'. पण त्यांचे या राज्यात तीन चारच खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. मात्र, असे असताना, कोंबड्याला काय वाटते, की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही, असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण, 'रात गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी परिस्थिती या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लवनात कधी तरी यांना ससा सापडेल, कधी तरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही," अशा शब्दात पडळकर यांनी शरदपवारांना टोले लगावले.
शरद पवारांना मोठा नेता मानत नाही आणि तुम्ही... -
शरद पवार हे साडे तीन जिल्ह्यांचे स्वीमी आहे. त्यांचे तीन खासदार आहेत. त्यांना मोठं कोण मणणार? तुम्ही कुणी मानत असाल तर त्याच्याशी मला देणे-घेणे नाही. मी त्यांना मोठा नेता मानत नाही. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्द्यांवर बोलतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या घरच्यांनी मुद्द्यांवर उत्तर द्यावं, ही विचारांची देवाण घेवाण आहे. असा टोलाही पडळकर यांनी पवारांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी -
ओबीसी मुद्द्यावर बोलताना पडळकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसंदर्भात राज्य सरकारला डेटा सादर करायला सांगितले होते, पण त्यांनी ते केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन समाजाच्या विरोधातील आहेत. यामुळेच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली, असेही पडळकर म्हणाले.