सरकारी अन् शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 11, 2023 04:28 PM2023-12-11T16:28:23+5:302023-12-11T16:29:23+5:30
जुनी पेन्शन योजनेची केली मागणी.
बाळकृष्ण दोड्डी,सोलापूर : सरकारी-निमसरकारी, शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबर पासून संपावर जाणार आहेत. या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना सोमवारी निवेदन दिले.
यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संपाचा इशारा दिला होता. याप्रकरणी राज्य शासनाने मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासन पुर्ती न झाल्याने राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे, १४ डिसेंबर पासून राज्यभरात बेमुदत संपाचा इशारा दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली.