सोलापूरच्या टर्सरी प्रकल्पाच्या निविदेला शासनाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:04 PM2017-08-23T13:04:03+5:302017-08-23T13:05:58+5:30
सोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली.
देगाव येथील ७५ एमएलडीचे अत्याधुनिक मलशुद्धीकरण केंद्र यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी या एनटीपीसीच्या अधिकाºयांबरोबर या केंद्रातून ५२ एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी घेण्याच्या करारावर सह्या केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जानेवारी २0१५ रोजी सोलापूरला भेट दिल्यावर शहराच्या पाणीटंचाईवर बैठक झाली होती. औज बंधाºयातून दर पाळीस गरजेच्या असणाºया अर्ध्या टीएमसी पाण्यासाठी उजनीतून दरवेळेस पाच टीएमसी पाणी भीमेत सोडावे लागते. पाणी सोडल्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसतात. याशिवाय पात्रात पाणी झिरपून नासाडी होते. हे टाळण्यासाठी देगाव मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसीला द्यावे व त्या बदल्यात त्यांनी जलवाहिनीतून येणारे पाणी घ्यावे असे ठरले. यानंतर सव्वा वर्षात यावर १0 बैठका होऊन चर्चा झाली. सांडपाणी घेण्याच्या करारपत्राच्या मसुद्यास एनटीपीसीने मान्यता दिल्याचे २१ एप्रिल रोजी कळविले. त्यानंतर एनटीपीसीचे सरव्यवस्थापक प्रकाश तिवारी यांनी या करारावर सह्या केल्यावर शासनाकडे टर्सरी प्रकल्पाचा प्रस्ताव गेला. आता शासनाने टेंडर काढण्यास मंजुरी दिल्याने जी संस्था हे काम घेईल त्यांना प्रकल्प उभारणीचा खर्च करावा लागेल. त्यानंतर एनटीपीसीने घेतलेल्या पाण्याच्या बिलातून खर्चाची परतफेड होत जाईल. टेंडर प्रक्रियेत टर्सरी प्रकल्पामुळे मनपाचा चांगला फायदा होईल हे पाहिले जाईल असे आयुक्त ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
------------------
२९६ कोटींचा प्रकल्प
देगाव केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर टर्सरी प्रकल्प उभारणे व तेथून पंपिंग करून हे पाणी एनटीपीसीला नेणे या कामाचा २९५ कोटी ५९ लाखांचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.