सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'; जाणून घ्या, कधी आणि कुठे होणार महाशिबीर?

By Appasaheb.patil | Published: May 22, 2023 03:14 PM2023-05-22T15:14:30+5:302023-05-22T15:14:39+5:30

या विभागांकडून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन किमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला यासारख्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत.

'Government at your door' in Solapur district; Find out, when and where the Mahashibar will be held? | सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'; जाणून घ्या, कधी आणि कुठे होणार महाशिबीर?

सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'; जाणून घ्या, कधी आणि कुठे होणार महाशिबीर?

googlenewsNext

सोलापूर : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वितरणासाठी जिल्हाभरात आगामी १५ दिवसांत महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

या महाशिबिरांमध्ये महसूल विभाग, संबंधित पंचायत समिती विभाग, कृषि विभाग, नगरपरिषद व नगर पंचायत, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास, आरोग्य, प्रादेशिक परिवहन विभाग यासह अन्य विभाग सहभागी होणार आहेत. या विभागांकडून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन किमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला (महाराष्ट्र राज्य), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला (सेंट्रल), विविध प्रकारचे दाखले, नवीन व दुबार शिधापत्रिका, नवमतदार नोंदणी, इमारत बांधकाम योजना, संजय गांधी योजना, फेरफार प्रत उपलब्ध करून देणे, आधार कार्ड अपडेशन, महिलांना शिलाई यंत्र वाटप, दिव्यांग साहित्य वाटप आदी विविध शासकीय सेवा, दाखले देण्यात येणार आहे.

असे आहे तालुकानिहाय शिबीराच्या तारखा

- उत्तर सोलापूर - नॉर्थ कोर्ट प्रशाला, सोलापूर, - १८ ते २६ मे २०२३

- बार्शी - तहसील बार्शी महसूल मंडळ स्तरावर - २२ ते २६ मे २०२३

- दक्षिण सोलापूर - मुस्ती, संभाव्य - ०२ जून २०२३ - मंद्रुप - जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, - २६ मे २०२३,

अक्कलकोट - अक्कलकोट, चपळगाव, कुरनूर, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, नागपूर, करजगी, तडवळ - २२ ते ३१ मे २०२३

- पंढरपूर - उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांचे कार्यालयासमोर असलेले प्रांगण, पंढरपूर - ६ मे २०२३

- मोहोळ - ९ महसूल मंडळ स्तरावर - २६ मे २०२३

- मंगळवेढा - मंगळवेढा - २१ ते २६ मे २०२३

- माळशिरस - पंचायत समिती सभागृह, माळशिरस २५ ते २७ मे २०२३

- माढा - पंचायत समिती सभागृह कुर्डुवाडी, १० महसूल मंडळ स्तरावर - २३ ते ३१ मे २०२३

- करमाळा - ११ महसूल मंडळ स्तरावर, दि. २१ ते २६ मे २०२३

- सांगोला - बचत भवन, पंचायत समिती - २६ मे २०२३

Web Title: 'Government at your door' in Solapur district; Find out, when and where the Mahashibar will be held?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.