सरकार संशोधक शेतकऱ्यांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:07+5:302021-03-08T04:22:07+5:30
मंत्रालयात आयोजित संशोधक शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे, शेतीनिष्ठ उद्योजक प्रवीण कसपटे, कृषी सचिव ...
मंत्रालयात आयोजित संशोधक शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे, शेतीनिष्ठ उद्योजक प्रवीण कसपटे, कृषी सचिव एकनाथ डवले,कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी फलोत्पादन सहसचिव अशोक आत्राम, फलोत्पादन संचालक शिरीष जमदाडे, कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी, राहुरी कृषीविज्ञान संशोधन संचालक एस. आर. गडाख व श्रीकांत कुलकर्णी, वाळूज, सीताफळ संशोधन केंद्र अंबोजोगाईचे डॉ. गोविंद मुंडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे गोविंद जाधव, विकास पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. कसपटे यांनी आपण पेटंट मिळविण्यासाठी घेतलेल्या बौध्दिक, शारीरिक, आर्थिक परिश्रमांबद्दल भुसे यांना माहिती दिली. एन.एम.के-१ गोल्डन जातीच्या सीताफळाची नक्कल करून काही रोपवाटिकाधारक शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे सांगून अशांवर तत्काळ कारवाईची मागणी केली. त्यांच्या मागण्यांची दखल घेत अशा बेकायदेशीर रोपवाटिकाधारकांवर कारवाईचे आदेश दिले.