शासनाने शेतकऱयांची फसवणूक केली : धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:45+5:302021-03-25T04:21:45+5:30
शेतीपंप व घरगुती खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येथील जळोली चौक (करकंब) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलन ...
शेतीपंप व घरगुती खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येथील जळोली चौक (करकंब) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब देशमुख, रयत क्रांतीचे दीपक भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे, अजय जाधव, शशिकांत पाटील, नंदू व्यवहारे आदी उपस्थित होते.
कोरोनाचे पाहिले संकट टळले नाही, तोपर्यंत दुसरे संकट आले आहे. शेती पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. शिवाय कालव्याला पाणी आले असताना वीजबिल भरण्याचा घाट घालून वीजजोडणी कट केली जात आहे. ही बाब गंभीर असून आम्ही आता गप्प बसणार नसल्याचा इशारा धोत्रे यांनी यावेळी दिला.
यावेळी विजवीतरणचे कनिष्ठ अभियंता माने यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावला होता.