शासनाचा निर्णय ; बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ मंडले दुष्काळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 07:00 PM2018-11-02T19:00:42+5:302018-11-02T19:02:03+5:30
७५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी; शहरी भाग वगळला
सोलापूर: शासनाने ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील चार व बार्शी तालुक्यातील नऊ अशी १३ मंडले दुष्काळी मदतीला पात्र होणार आहेत. शहरी भागातील बार्शी व सोलापूर ही मंडले वगळली आहेत.
राज्य शासनाने नऊ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आणि उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यांना वगळले आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळीमध्ये समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १० मंडलांपैकी बार्शी मंडल वगळता ९ मंडलात तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५ मंडलांपैकी सोलापूर वगळता ४ मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील १५ पैकी १३ मंडले दुष्काळीमध्ये सामावली आहेत. सोलापूर मंडलात ८१.०१ टक्के तर बार्शी ८८.६ टक्के .
मार्डी मंडलात अवघा ७ टक्के पाऊस
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी मंडलात ३९.०७ टक्के, तिºहे मंडलात २२.०९ टक्के, मार्डी मंडलात ७.८ टक्के तर वडाळा मंडलात ३६.०२ टक्के पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डी ६८.६ टक्के, खांडवी ५७.२ टक्के, आगळगाव ६१.०१ टक्के, वैराग- ५९.०१ टक्के, उपळेदुमाला- ३१.०२ टक्के, गौडगाव ५७.०८ टक्के, पांगरी- ६०.०१ टक्के, पानगाव ६०.०० टक्के, नारी ४६.०० टक्के आदी मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पाऊस झाल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निकषानुसार ही मंडले वगळली जाणार आहेत.