गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:30 AM2019-02-18T06:30:54+5:302019-02-18T06:31:31+5:30

श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मुळेगाव तांडा येथे बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

Government does not even have money for carrot cartoon, Ashok Chavan criticized | गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका

गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका

Next

सोलापूर : सरकारने सर्व समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखविले आहे. बौध्द, मातंग, बंजारा यासारख्या समाजासाठी असणाऱ्या विकासाच्या योजना सरकारने बंद केल्या आहेत. उध्दव ठाकरे म्हणाले होते, गाजराची पुंगी करून वाजवायलाही सरकारकडे पैसे नाहीत, तेच खरे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मुळेगाव तांडा येथे बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे होते. खा. चव्हाण म्हणाले, मागासवर्गीय व वंचितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाकडून चालविण्यात येणाºया अनेक योजना सरकारने बंद केल्या आहेत. आज गतीने विकासकामांसाठी दगडं रचली जात आहेत. मात्र सरकारकडे पैसाच नसल्याने ही दगडं निवडणुकीनंतर तशीच राहणारी आहेत. पाच वर्षांत
बेरोजगारांना नोकºया देता आल्या नाहीत, आता सांगतात की, चहा, भजी विका. पण युवकांनी शिक्षण घेतले आहे काय? असा सवाल चव्हाण यांनी केला.

आघाडीचे चित्र आठ दिवसांत स्पष्ट होईल
उस्मानाबाद : काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांनीही सहभागी व्हावे, यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. परंतु, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ‘सीपीएम’ही आघाडीत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत संपूर्ण आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे खा. अशोक चवहाण यांनी सांगितले.

Web Title: Government does not even have money for carrot cartoon, Ashok Chavan criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.