शासनाने सोलापूरला उजनी धरणाचे बारमाही पाणी दिलेच पाहिजे : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:33+5:302021-05-23T04:22:33+5:30
भीमानगर : उजनी धरणाची निर्मिती ४५ वर्षांपूर्वी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ...
भीमानगर : उजनी धरणाची निर्मिती ४५ वर्षांपूर्वी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. त्या धोरणाला मंत्रिमहोदयाकडून छेद देण्यात येतो. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीरपणे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता. तो अद्याप पाळला नाही त्यामुळे आंदोलन अद्याप सुरूच आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दात जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी जनहितचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे-पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगिरे, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, अकोले बु.चे सरपंच पवार, सतीश सुर्वे, तुषार पाटील, चंद्रकांत थोरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
.