आषाढी यात्रेबाबत शासन नियमावली जाहीर; जाणून घ्या कशी होणार यंदाची पंढरपूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 07:29 PM2021-06-14T19:29:56+5:302021-06-14T19:30:02+5:30

आषाढी यात्रा होणार अशी... यात्रेसंदर्भात शासन आदेश निघाला

Government regulations regarding Ashadi Yatra announced; Find out how this year's Pandharpur Wari will be | आषाढी यात्रेबाबत शासन नियमावली जाहीर; जाणून घ्या कशी होणार यंदाची पंढरपूर वारी

आषाढी यात्रेबाबत शासन नियमावली जाहीर; जाणून घ्या कशी होणार यंदाची पंढरपूर वारी

Next

पंढरपूर : येत्या आषाढी वारी संदर्भात १० जून रोजी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सध्या परिस्थिती लक्षात घेऊन आषाढी यात्रा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शासनाने याबाबत एक नियमावली तयार केली आहे.

  • ▪️मानाच्या १० पालखी सोहळ्यांचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा : यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखा व दिंड्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल.
  • ▪️मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी करण्याबाबत  प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायीवारी करता येणार आहे.
  • ▪️मानाच्या पालखी सोहळ्यांचा पंढरपूर येथील मुक्काम कालावधी : यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पोर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करता येणार आहे.
  • ▪️शासकीय महापुजा, श्री विठ्ठलास संतांच्या भेटी : गतवर्षी प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.
  • ▪️विठ्ठलाचे २४ तास दर्शनाबाबत : विठ्ठलाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल.
  • ▪️श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी : २+२ असे एकूण ४ व्यक्तिंच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  • ▪️श्री संत विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक : १ ते १५ साध्या पध्दतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  • ▪️ह.भ.प. श्री गुरुदास महाराज देगलूरकर यांचे चक्रीभवन : ह.भ.प. देगलूरकर महाराज व अन्य ४ व्यक्ती असे एकूण ५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
  • ▪️ह.भ.प. श्री अंमळनेरकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांचे दर्शनाबाबत : ह.भ.प. श्री अंमळेनरकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी २ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
  • ▪️महाद्वार काला व श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा : हा उत्सव १ + १० व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरी करण्यास परवानगी देण्यात आली.
  • ▪️एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव : रथा ऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे ५ कर्मचारी असे १५ वक्तीसह कोरोनाचे नियम पाळून एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव साजरी करावा.
  • ▪️संताच्या पादुका भेटी : यावर्षी प्रती मानाच्या पालखी ४० वारकऱ्यांना संताच्या पादुका भेटीची परवानगी देण्यात आली आहे.
  • ▪️वारकरी संख्या : २ बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० वाकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास पारवानगी देण्यात आली आहे.
  • ▪️गोपाळकाला : मानाच्या पालखी सोहळ्यांना १ + १० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व किर्तन करावे.
  • ▪️संताचे नैवेद्य व पादुका : दशमी ते पोर्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी देण्यात येत आहे.
  • ▪️संत एकनाथ महाराज काला : संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीला ज्या प्रमाणात शासनाकडून प्राप्त होईल. तितक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबत मंदिर समितीमार्फत नियोजन करण्यात येईल.
  • ▪️प्रक्षाळपुजा : श्री विठ्ठलाची प्रक्षाळपुजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक २ + ३ श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा २ + ३, श्री विठ्ठलाकडे ११ ब्रम्हवृंदांकडून विठ्ठलास रुद्राचा अभिषेक व रुक्मिणीमातेस ११ ब्रम्हवृंदास पवनमान अभिषेक करता येणार आहे.
  • ▪️स्थानिक दिंडीकरी व फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी व्यवस्था  : आषाढी एकादशी दिवशी स्थानिक महाराज मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मुखदर्शन देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

Web Title: Government regulations regarding Ashadi Yatra announced; Find out how this year's Pandharpur Wari will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.