शासकीय योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, सुनील गायकवाड यांचे आवाहन, सोलापूरातील सामाजिक परिवर्तन समितीला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:36 PM2018-02-15T12:36:13+5:302018-02-15T12:44:01+5:30

दलित समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी येथे बोलताना केले. 

Government schemes should be benefitted by the entrepreneurs, Sunil Gaikwad appealed, Social change committee visited Solapur | शासकीय योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, सुनील गायकवाड यांचे आवाहन, सोलापूरातील सामाजिक परिवर्तन समितीला दिली भेट

शासकीय योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, सुनील गायकवाड यांचे आवाहन, सोलापूरातील सामाजिक परिवर्तन समितीला दिली भेट

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक परिवर्तन रॅली संयोजन समितीच्या कार्यालयास खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट दिली सामाजिक परिवर्तन समितीच्या कार्याची माहिती घेऊन पुढील वाटचालीस खासदार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : दलित समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी  येथे बोलताना केले. 
सामाजिक परिवर्तन रॅली संयोजन समितीच्या कार्यालयास खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जी. एम. संस्थेचे बाळासाहेब वाघमारे व बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सामाजिक परिवर्तन समितीच्या कार्याची माहिती घेऊन पुढील वाटचालीस खासदार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.  
यावेळी पीपल्स पार्टीचे शांतीकुमार नागटिळक, युवा भीम सेनेचे पंकज काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश निकंबे, शिवसेनेचे राजू हौशेट्टी, भाजपचे संभाजी भडकुंबे, आरपीआयचे (ए) तालुका उपाध्यक्ष रवी गायकवाड, पप्पू गायकवाड, अनिल गायकवाड, दामोदर जाधव, सचिन गायकवाड, रिंकू चौधरी, रोहित गायकवाड, रोहन गायकवाड, सचिन कांबळे, आप्पासाहेब बागले, अ‍ॅड. हरी रणदिवे, सचिन गायकवााड, सुकुमार बनसोडे, वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि इंद्रजित गायकवाड, अजय क्षीरसागर, रियाज शेख, सुरेश गायकवाड, दत्ता बाबरे, मॅडी दुपारगुडे, माशाळकर, राजू पाटील, नरेंद्र शिंदे, प्रकाश जबडे, विकी शेंडगे आदी उपस्थित होते. 

Web Title: Government schemes should be benefitted by the entrepreneurs, Sunil Gaikwad appealed, Social change committee visited Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.