शासनाने कांदा ३० रुपये किलो भावाने खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:20+5:302021-09-05T04:27:20+5:30
निवेदनात म्हटले आहे की, आता कांद्याचे दर १२ ते १५ रुपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील ...
निवेदनात म्हटले आहे की, आता कांद्याचे दर १२ ते १५ रुपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरीत्या थेट शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा. कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणीची दखल न घेतल्यास कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. शैलेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा अध्यक्ष नितीन कापसे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप चिपडे व शेतकरी श्रीकांत ढेगळे उपस्थित होते.
---