सोलापुरात ‘जीएसटी’चे सरकारी स्वागत
By admin | Published: July 1, 2017 01:29 PM2017-07-01T13:29:35+5:302017-07-01T13:29:35+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची देशभर अंमलबजावणी झाली असली तरी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये आणखी बराच संभम्र असल्यामुळे या नवीन करप्रणालीबाबत फारसे कुणी उत्सााहाने बोलताना दिसून येत नाही; मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या कर कार्यालयांमध्ये या नवीन कराचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. अधिकारी या कराच्या फायद्यांविषयी भरभरून बोलत आहेत. कर सल्लागारांमार्फतही व्यापाऱ्यांना कररचना समजावून सांगितली जात आहे. शिवाय विक्रीकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयांची नावेही आता ‘जीएसटी भवन’ अशी करण्यात आलेली आहेत.
येथील पूर्वीचे विक्रीकर भवन आणि आताच्या जीएसटी भवनात सकाळी व्यापारी, नागरिक, चार्टर्ड अकौंटंटस् आणि कर सल्लागारांना आमंत्रित करून स्वागताचा स्नेहमेळावा घेण्यात आला. राज्य कर सहआयुक्त उमाकांत बिराजदार, केंद्रीय कर सहाय्यक आयुक्त जी. आर. देसाई, सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांची यावेळी प्रमुख उपस्थितीती होती. करावर ‘नो कर’ म्हणजेच जीएसटी अशी व्याख्या बिराजदारदार यांनी सांगितली.
--------------
नव्वद टक्के व्यापाऱ्यांची नोंदणी
सोलापूर जीएसटी कार्यालयाला उस्मानाबाद जिल्हाही जोडण्यात आला असून, या दोन्ही जिल्ह्यातील व्हॅट नोंदणीकृत असलेल्या ९० टक्के व्यापाऱ्यांनी ‘जीएसटी’ नोंदणी केली असून, व्यापाऱ्यांना मार्गदर्शनासाठी जीएसटी सुविधा कक्ष कार्यरत असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.