सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

By Appasaheb.patil | Published: May 21, 2023 12:05 PM2023-05-21T12:05:00+5:302023-05-21T12:05:16+5:30

पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे रविवारी दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Govt protests by pouring milk on streets in Solapur; Farmers' organization aggressive for increase in milk price | सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

googlenewsNext

सोलापूर : पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे रविवारी दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याचवेळी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. 

रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील, शेतकरी नेते समाधान फाटे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. कमी केलेले दुधाचे दर पुर्ववत करा अन्यथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांना २५ तारखेपासून जिल्हात फिरू देणार नाही असा इशारा दिला. याशिवाय  दुधाचे दर खाजगी दुध संघांनी जाणूनबूजून दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे २५ तारखेनंतर दुधाचे टँकरही फिरू देणार नसल्याचाही इशारा यावेळी शेतकरी संघटनांनी दिला. 

या आंदोलनाप्रसंगी दिपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, अरूण आसबे, रणजित बागल, छगन पवार, बाळासाहेब बोबडे, सचिन आटकळे, विश्रांती भुसनर, निवास नागणे  साहेबराव नागणे, शहाजी जगदाळे, उपरीत गावचे सर्व दुध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या आहेत शेतकरी संघटनांच्या मागण्या

- गाईच्या दुधाला प्रती लिटर ४० व म्हशीच्या दुधाला ७० दर मिळाला पाहिजे 
- ऊसाच्या एफ आर पी सारखी दुधाला एफ आर पी प्रमाणे दर द्या 
- भेसळ दूधावर कार्यवाही करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
- लंप्पीच्या आजारावर मोफत लशीकरण करण्यात यावा
- खाजगी व सहकारी दूध संघाचे ऑडीट करून दुध व्यवसायामध्ये पारदर्शकता असावी

 

Web Title: Govt protests by pouring milk on streets in Solapur; Farmers' organization aggressive for increase in milk price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.