निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी

By काशिनाथ वाघमारे | Published: September 8, 2023 06:08 PM2023-09-08T18:08:28+5:302023-09-08T18:09:34+5:30

सोलापूर : मराठा समाजाला सरसकट कुंनब्याचे दाखले द्यावेत, अशी मागणी असताना सरकारने निजाम कालीन पुरावे असणाऱ्यांनाच ओबीसीचे दाखले दिले ...

GR regarding giving certificates on Nizam era evidence Holi in Ghanegaon by Sakal Maratha Samaj | निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी

निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी

googlenewsNext

सोलापूर : मराठा समाजाला सरसकट कुंनब्याचे दाखले द्यावेत, अशी मागणी असताना सरकारने निजाम कालीन पुरावे असणाऱ्यांनाच ओबीसीचे दाखले दिले जातील, असा जीआर काढला आहे. या जीआरची घाणेगाव (ता. बार्शी) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. शनिवारी उपोषण करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बार्शी तालुका संभाजी ब्रिगेटचे अध्यक्ष आनंद काशीद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी रणजित पाटील, अमोल मोरे, सतीश नवले, उमेश शिंदे, अक्षय पाटील, प्रदीप मोरे, सुहास शिंदे, पोपटराव जाधव, बाबासाहेब मोरे, संपत बचुटे, राजाभाऊ बचुटे आदींसह घाणेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः तरुणांची संख्या लक्षणीय होती.
 

Web Title: GR regarding giving certificates on Nizam era evidence Holi in Ghanegaon by Sakal Maratha Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.