ग्रामपंचायत, शेतीपंपांची तोडलेली वीज जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:36+5:302021-03-23T04:23:36+5:30
हे आंदोलन प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. वीज तोडणीमुळे बऱ्याच गावातील वीजपुरवठा बंद झाला. ...
हे आंदोलन प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. वीज तोडणीमुळे बऱ्याच गावातील वीजपुरवठा बंद झाला. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायती थकबाकी भरण्यास तयार पण सध्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे एक वर्षांपासून थकबाकी वसुली बंद आहे. शिवाय शासनानेही निधीला कात्री लावली. अशातच महावितरणने कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून तोडलेली वीज पूर्ववत जोडावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
आंदोलनकर्त्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांनी स्वीकारले. यावेळी संघटक पंडित मिरगणे, दादासाहेब बरडे, रोंगे, विकास माने, किशोर पाटील, काका पफाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो
२२बार्शी-आंदोलन
ओळी
महावितरणने सुरू केलेली वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, तोडलेली वीज जोडावी, या मागणीसाठी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव व कार्यकर्ते.