ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पाडावी : साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:37+5:302021-01-08T05:09:37+5:30

पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यासाठी नवीन शासकीय धान्य गोदाम (अनवली, ता. पंढरपूर) येथे नियुक्त १,७३६ अधिकारी ...

Gram Panchayat elections should be held smoothly: Salunkhe | ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पाडावी : साळुंखे

ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पाडावी : साळुंखे

Next

पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यासाठी नवीन शासकीय धान्य गोदाम (अनवली, ता. पंढरपूर) येथे नियुक्त १,७३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी निवडणूक नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, नायब तहसीलदार पी. के. कोळी, महसूल साहाय्यक एस. बी. कदम, एस. आर. कोळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणूक नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट आदींबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. मॉकपोल, घोषणापत्रे इतर निवडणूक संदर्भातील नमुने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. मतदासाठी येणाऱ्या मतदाराला मास्क लावणे बंधनकारक केले असल्याचे निवडणूक प्राधिकृत अधिकारी विवेक साळुंखे यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::::::

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पूर्ण करावे. यामध्ये निष्काळजीपणा केल्यास त्यांच्याविरुद्ध निवडणूक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.

- विवेक साळुंखे

तहसीलदार तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी

Web Title: Gram Panchayat elections should be held smoothly: Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.