ग्रामपंचायत कर्मचारी शोधणार संपर्कातील व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:47+5:302020-12-06T04:23:47+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या माझे गाव कोरोनामुक्त मोहिमेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या माझे गाव कोरोनामुक्त मोहिमेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. मोहिमेचा शुभारंभ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य, गटविकास, गटशिक्षण आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे. आशा वर्कर व आरोग्यसेवक समितीच्या मदतीला देण्यात आले आहेत. ज्या गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या करण्यात येणार आहेत.
पॉझिटिव्ह व्यक्तींचा शोध घेणे, क्वारंटाईन, उपचारास दाखल करणे ही जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका वैद्यकीय अधिक़ारी पार पाडणार आहेत. यावर गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. तालुकास्तरावर आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत आढावा घेणार आहेत.
दंडात्मक कारवाई होणार
गावातील दुकानदार, भाजी मार्केट व रस्त्यावरून जाणाऱ्यांची तपासणी ग्रामपंचायतीचे पथक करणार आहे. मास्क नसलेल्यांना जागेवर पाचशे दंड तर दुकानदारांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. पोलीस विभागही अचानकणे नाकाबंदी करून मास्कची तपासणी करणार आहे.