ग्रामपंचायत बिनविरोधची औपचारिकताच बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:14+5:302020-12-26T04:18:14+5:30
जैनवाडी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. मागील निवडणुका चुरशीच्या झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले ...
जैनवाडी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. मागील निवडणुका चुरशीच्या झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांच्या नेतृत्वात या गावाने ग्राम स्वच्छता अभियान ते तंटामुक्त ग्राम अभियान, स्वछ भारत अभियान, पर्यावरण समृद्ध ग्राम अभियानासह शासनाच्या सर्वच अभियानात सहभाग घेऊन जैनवाडी ग्रामस्थांनी पुरस्कार पटकावले आहेत.
या निमित्ताने ग्रामस्थांनी आपला एकोपा वेळोवेळी सिद्ध केलेला आहे. याच एकोप्याने यावेळची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय गावातील सर्वच युवकांनी घेतला. त्यानुसार बैठक होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले आहे. उमेदवारी अर्जही ठरल्यानुसार दाखल केले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणूक बिनविरोध झाल्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार, विजय साळवे, आप्पासो दानोळे, किरण दानोळे, अशोक मिरजे, हणमंत सोनवले, हणमंत कलागते, सुनील शिंगटे, गजेंद्र देसाई, अमित खाणे, राहुल हातगिणे, संजय गोफणे, भारत गोफणे, सुनील वठारे, मोहन लिंगडे, हिंमत हसुरे, महादेव लिंगडे, किरण सदलगे, बाबासो शिंगटे, अशोक सदलगे, हणमंत लिंगडे, बंडू लिंगडे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, अनिल शिंदे, नेताजी गोफणे, मोहन माने, पवन मोरे, बिभीषण पवार, कृष्णा पवार, प्रकाश शिंगटे, कुमार शिंगटे, दत्तात्रय सुतार, बाळासो जमदाडे, सचिन गोफणे, समाधान पवार, सचिन वाखरे, विशाल गोफणे, हिंमत लिंगडे, जालिंदर गोफणे, रोहीत मेंढेगिरी, मानाजी पवार, सुनील पवार, शिवाजी शिंगटे, आप्पासो शिंगटे, कुलभूषण उदगावे, प्रल्हाद देवकर, सुकुमार मिरजे, विनायक लिंगडे, हणमंत गुजर, रमेश पाटील, बलभिम होनमाने, निरज पवार, नंदकुमार मोरे, संजय मोरे, बाळासो वाघमारे, राजकुमार उमडाळे, प्रशांत भोसेकर, हणमंत सुरपुसे, राजेंद्र पवार, जोतिराम देवकर यांनी प्रयत्न केले.
कोट ::::::::::::::::::::::::
काही ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी निवडणूक बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी सर्वच ग्रामस्थांनी संकुचितपणा न ठेवता पाठिंबा दिला. त्यामुळे प्रथम अशक्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरली. याचा गावाच्या विकासासाठी फायदा होईल, यापुढील सर्वच निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
- ॲड. दीपक पवार
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
फोटोओळ :::::::::::::::::
जैनवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांच्यासह ग्रामस्थ, नवनिर्वाचित सदस्य.