उजनीतील पाणी वाचवण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:14+5:302021-05-17T04:21:14+5:30
भीमानगर : उजनी धरणातील हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ठराव ...
भीमानगर : उजनी धरणातील हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ठराव करावेत, असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांनी केले.
उजनी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रभाकर देशमुख यांच्या जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यास रयत क्रांतीने पाठिंबा दिला. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांना संबोधित असाताना ग्रामपंचायतींनी ठराव करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
उजनीतील सांडपाणी मोजमाप करण्याची यंत्रणा शासनाकडे नाही. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सांडपाणी किती जमा होते याची आकडेवारी जलसंपदा विभागाकडे नाही. तरीसुद्धा सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी मंजुरी दिली आहे. सध्या मंजूर केलेला पाण्याचा आदेश सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी रयत क्रांतीने केला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार संघटनेचे संघटक विठ्ठल मस्के, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, रयतचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत करळे, आप्पा गवळी, अमोल ऊबाळे, धवल पाटील उपस्थित होते.