विद्यापीठात आजपासून ग्रंथमहोत्सव

By admin | Published: January 28, 2015 12:48 AM2015-01-28T00:48:51+5:302015-01-28T00:59:07+5:30

उद्या ५१ वा दीक्षान्त समारंभ : मंडप उभारणीसह विविध कामांची लगबग

Grammeham Festival at the university today | विद्यापीठात आजपासून ग्रंथमहोत्सव

विद्यापीठात आजपासून ग्रंथमहोत्सव

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या, बुधवारी व गुरुवारी (दि. २९) ‘ग्रंथ महोत्सव’ होत असून, विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाने सलग नवव्या वर्षी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
विद्यापीठातील लोककला केंद्रात उद्या सकाळी साडेदहा वाजता ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होईल. त्यानंतर याठिकाणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे ‘छेडछाड का? हे नाटक होणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडीला कुलगुरु डॉ. पवार यांच्या हस्ते प्रारंभ होईल. कमला कॉलेज, जनता बझार, राजारामपुरी, आईचा पुतळा, सायबर चौकामार्गे विद्यापीठातील लोककला केंद्रात ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी दिली आहे. दरम्यान, ग्रंथमहोत्सवासाठी मंडप उभारणी, स्टॉल लावणे तसेच दीक्षान्त समारंभानिमित्त मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई करणे, लोककला केंद्रातील सजावट आदी स्वरूपातील तयारीची लगबग आज, मंगळवारी दिवसभर सुरू होती. (प्रतिनिधी)

के.एम.टी.ची विशेष बससेवा
दीक्षान्त सोहळ््यासाठी केएमटीतर्फे गुरुवारी (दि. २९) विशेष बससेवा देण्यात येणार आहे. शुगर मिल व शिवाजी चौक येथून सकाळी ६.३० वा.पासून बससेवा असेल. या बसेस छत्रपती शिवाजी महाराज चौक, सायन्स कॉलेज, विनायक बंगला, रेल्वे फाटक-राजारामपुरी सम्राटनगर/ सायबर-शिवाजी विद्यापीठ अशा जातील. त्याचप्रमाणे साळोखेनगर आपटेनगर-कागल-कणेरीमठ या बसेस शिवाजी विद्यापीठामार्गे धावतील. बाहेरगावांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे फाटक नं १ येथून प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने बस असेल.

महोत्सवात ४० स्टॉल्स
महोत्सवात देशासह परदेशातील प्रकाशक, कंपनी, विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजिटल ग्रंथ आदी स्वरूपातील ४० स्टॉल्स् असणार आहेत. विद्यापीठाच्या प्रकाशनांचादेखील यामध्ये समावेश असणार असल्याने हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे डॉ. खोत यांनी सांगितले.

‘ज्ञानसूर्य’ झळाळला
शिवाजी विद्यापीठाचा ५१ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी होणार आहे. विद्यापीठाला ‘नॅक’च्या मिळालेल्या ‘अ’ मानांकनामुळे या वर्षीच्या दीक्षान्त समारंभाचा आनंद आगळाच आहे. विद्यापीठातील प्रत्येक घटकाकडून समारंभाची उत्साहाने तयारी सुरू आहे. या समारंभानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला मंगळवारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे हे ज्ञानमंदिर झळाळून निघाले.

Web Title: Grammeham Festival at the university today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.