ग्रामसेवक संघाने २०१७ पासून पाठपुरावा केला : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:46+5:302021-06-04T04:17:46+5:30
कुर्डूवाडी : जिल्ह्यातील ४५ ग्रामसेवकांना २०१४ पासून ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना रोष्टर मंजूर नसल्याने पदोन्नतीचा लाभ दिला ...
कुर्डूवाडी : जिल्ह्यातील ४५ ग्रामसेवकांना २०१४ पासून ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना रोष्टर मंजूर नसल्याने पदोन्नतीचा लाभ दिला दिला जात नव्हता. ग्रामसेवक संघांच्यावतीने समाज कल्याण उपआयुक्त पुणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २०१७ पासून पत्रव्यवहार केला. झेडपी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या मदतीने पाठपुरावा केला. जानेवारी २१ मध्ये रोष्टर मंजूर करून घेतले. आज जिल्ह्यातील ४५ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याचे ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी सांगितले.
तात्यासाहेब पाटील पुढे म्हणाले विस्तार अधिकारी (कृषी) दोन, ग्रामविकास अधिकारी यांनाही हा लाभ मिळणार आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, प्रकाश वायचळ, सीईओ दिलीप स्वामी यांनी विभागीय आयुक्त यांना फोन करून प्रशासकीय बैठकीत विषय घेऊन ग्रामसेवक पदोन्नतीबाबत आग्रह धरला होता. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्याबाबतीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, सदस्य यांचेही सहकार्य लाभल्याचे तात्यासाहेब पाटील यांनी सांगितले. (वा. प्र.)
---
०३ तात्यासाहेब पाटील