महाआघाडी सरकारला डोकंच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:22+5:302021-04-07T04:23:22+5:30
राजंणी (ता. पंढरपूर) येथे भाजपच्या उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे बोलत होते. यावेळी आ. प्रशांत ...
राजंणी (ता. पंढरपूर) येथे भाजपच्या उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत हेगडे, रिपाइंचे सुनील सर्वगोड, वसंत देशमुख, दीपक भोसले, माऊली हळणवर यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले, हे फक्त खाणारे सरकार आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे.
आमदार परिचारक म्हणाले, राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायचे म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना यावे लागते. ‘विठ्ठल’चा संचालकच म्हणतो विठ्ठल कारखान्याच्या निवडीत घोडेबाजार झाला आहे. असल्या राजकरणाची किळस वाटते, असे परिचारक म्हणाले.
गंध पावडर करून सांगोल्यांचे पाहुणे पंढरपुरला
सांगोल्यातील पाहुणे पंढरपूरला हातात गजरे बांधून, गंध पावडर करून आले होते. त्यांनी सांगोल्याच्या कारखान्याची वाट लावली. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा दिला नाही. तो पैसा टेंभुर्णी ते चौफुल्यापर्यंत उधळला. सोनके (ता. पंढरपूर) येथील तळात मुक्काम करून आमदारकी मिळवली अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी नाव न घेता माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर केली.
---