शिष्यवृत्ती, गंभीर आजारांसाठी सोलापूरसाठी सतरा लाखांचे अर्थसहाय्य मंजूर
By appasaheb.patil | Published: March 23, 2019 12:45 PM2019-03-23T12:45:01+5:302019-03-23T12:49:01+5:30
ललित कला भवन, रविवार पेठ,सोलापूर कामगार कल्याण मंडळ : लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा
सोलापूर : शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके सहाय्य, गंभीर आजार, संगणक प्रशिक्षण आदी योजनेंतर्गत असलेल्या ५२३ लाभार्थ्यांना १७ लाखांचे सहाय्य मंजूर झाले आहे. मंजूर निधी प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक आनंद धडके, कल्याण निरीक्षक तिपण्णा करजगी यांनी दिली.
मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९४३ अंतर्गत मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाºया कामगार, कामगार कुटुंबीय, विद्यार्थ्यांना गट कार्यालय, सोलापूर अंतर्गत येणाºया ललित कला भवन, रविवार पेठ येथे सन २०१८-२०१९ या वर्षासाठी योजना होती़ या योजनेत दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, चंद्रभागानगर, भाळवणी, जीआरपी, एसटी महामंडळ, एलआयसी आदी आस्थापनेवरील कामगार व कामगार कुटुंबीयांनी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके सहाय्य, गंभीर आजारासाठी अर्थसहाय्य करणे यासाठी ५२३ लाभार्थ्यांनी कामगार कल्याण मंडळाकडे अर्ज केला होता़ त्यानुसार कल्याण मंडळाने शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी शासनाकडून मंजूर करून घेतला़ शासनाने कल्याण मंडळाकडे १७ लाखांचा निधी वर्ग केला आहे़ त्यानुसार मंडळाने संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याची माहिती केंद्र संचालक तिपण्णा करजगी यांनी दिली़
आमच्या कार्यालयाकडून दरवर्षी कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. याशिवाय गंभीर आजार, शैक्षणिक साहित्य आदींसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़ २०१८-२०१९ या वर्षासाठी ५२३ लाभार्थ्यांनी अर्ज केला होता़ या लाभार्थ्यांसाठी शासनाने १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे़ तो निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे़
- आनंद धडके,
केंद्र संचालक, ललित कला भवन,