राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:55 PM2017-11-07T12:55:07+5:302017-11-07T13:07:59+5:30

सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद आहे. 

Grant of sugarcane crushing to 116 sugar factories in the state | राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी

राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी

Next
ठळक मुद्देएकूण १९३ कारखान्यांनी मागितला होता परवाना राज्यातील सहकारी १०० व खासगी ९३ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन अर्जएफ. आर.पी. न देणाºया साखर कारखान्यांना कदापिही गाळप परवाना मिळणार नाही


अरुण बारसकर 
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद आहे. 
एक नोव्हेंबरपासून राज्यात साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात कारखाने  सुरळीत चालण्यासाठी आठवडा जाईल, असे सांगण्यात आले. शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांना पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, असा इशारा दिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आहे. राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ११६ कारखान्यांना आतापर्यंत गाळप परवाना दिला आहे. उर्वरित साखर कारखान्यांचे परवाने प्रलंबित आहेत.  प्रलंबित ७५ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. दिली नाही, तर अन्य ५४ साखर कारखान्यांकडे शासकीय व कामगारांची देणी आहेत. एफ.आर.पी.ची रक्कम देणाºया साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.  शासकीय देणी देण्याबाबतचे  ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र देणाºया साखर कारखान्यांनाही गाळप परवाना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफ.आर.पी. न देणाºया कारखान्यांना परवाना मिळणारच नाही, असे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर या तीन जिल्ह्यापैकी एकट्या सोलापुरात २८ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या अधिक आहे.
---------------------------------
एकूण १९३ कारखान्यांनी मागितला होता परवाना
- पुणे विभागात सोलापूर, पुणे व सातारा हे जिल्हे असून, एकट्या सोलापूर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने आहेत. कोल्हापूर विभागात सांगली, कोल्हापूर हे तर कारखाने नसलेल्या कोकणातील काही जिल्ह्यांचाही समावेश आहे. 
- राज्यातील सहकारी १०० व खासगी ९३ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केला होता त्यापैकी ५७ सहकारी व ५९ खासगी कारखान्यांना गाळप परवाना दिला.
- एफ.आर.पी. न दिलेल्या २१ कारखान्यांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश असून, तीन कारखाने आर्थिक व अन्य कारणांमुळे सुरुच होणार नाहीत.
------------------
एफ. आर.पी. न देणाºया साखर कारखान्यांना कदापिही गाळप परवाना मिळणार नाही. कामगारांची देणी दिलीच पाहिजे. शासकीय देणी देण्याबाबत हमीपत्र दिले तर गाळप परवाना देऊ.
- संभाजी कडू-पाटील,
साखर आयुक्त, पुणे

Web Title: Grant of sugarcane crushing to 116 sugar factories in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.